19-09-2020 - 19-09-2020

रो. शैलेश व अल्पना आणि गांधी परिवार यांच्या तर्फे , रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या माध्यमातुन 'सार्थक सेवा संघ' सासवड यांच्या सेवाकार्यास अभिवादन म्हणून आज रोजी दिनांक 19 सप्टेंबर 2020 रोजी 'सार्थक' या संस्थेस सदिच्छा भेट! यावेळी संस्थेला एक महिनाभर पुरेल एव्हढे धान्य, कडधान्ये , वस्त्र , मिठाई इत्यादी भेट देण्यात आले. निष्पाप , वंचित मुलांना जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. अनिल कुडीया यांनी आंबळे, सासवड या गावी 'सार्थक सेवा संघ' सुरू केला. या मुलांच्या आयुष्यात अर्थ भरता आला तरच जीवन सार्थकी लागलं असं मानून जगणाऱ्या कुडीया कुटुंबाच्या सार्थकाची ही कहाणी. दिशाहीन भटकणाऱ्या मुलांना असुरक्षित वातावरणातून दूर नेऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पत्नीच्या पाठबळावर गेली ७ वर्षे पाच ते अठरा वयोगटातील ७६ सभासदांचे कुटुंब म्हणून उभी असलेली संस्था म्हणजेच 'सार्थक'. निस्वार्थी भावनेने स्वतःचा संसार त्याग करणारे डॉक्टर कुडीया म्हणतात, "इतरांची सेवा करून स्वतःचे जीवन सार्थकी लावणे हा माझा स्वार्थ वगळता यात माझे काहीच नाही!"

Project Details

Start Date 19-09-2020
End Date 19-09-2020
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 72
No of direct Beneficiaries 85
Partner Clubs no
Non Rotary Partners no
Project Category